शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

'ऑपरेशन अर्णब'साठी करण्यात आली होती मोठी तयारी, गृह विभागानं तयार केली 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 6, 2020 10:48 IST

इंटीरियर डिझायनर अन्वय आणि त्यांच्या आईने दोन वर्षांपूर्वी केलेल्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यसाठी केस पुन्हा ओपन करण्याच्या रायगड पोलिसांच्या परवानगीनंतर, 'ऑपरेशन अर्णब'ची तयारी सुरू झाली. यासाठी मुंबई आणि रायगडहून एकूण 40 पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र करण्यात आले होते.

ठळक मुद्देकोंकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांची उच्च स्तरीय टीम तयार करण्यात आली होती. "...तर अर्णब शहर सोडण्याची होती भीती""प्रत्येक छोट्या गोष्टीचं होतं प्लॅनिंग"

मुंबई - इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांना कथितपणे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक (Editor-in-chief) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राज्याच्या गृह विभागाने अर्णब यांच्या अटकेसाठी कोंकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांची उच्च स्तरीय टीम तयार करण्यात आली होती. 

इंटीरियर डिझायनर अन्वय आणि त्यांच्या आईने दोन वर्षांपूर्वी केलेल्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यसाठी केस पुन्हा ओपन करण्याच्या रायगड पोलिसांच्या परवानगीनंतर, 'ऑपरेशन अर्णब'ची तयारी सुरू झाली. यासाठी मुंबई आणि रायगडहून एकूण 40 पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र करण्यात आले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्णब यांच्या अटकेची योजना मोहितेंनी तयार केली होती. तर हाय प्रोफाईल एनकाउंटर स्पेशालिस्ट सचिन वाजे यांच्याकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कॅबिनेटमधील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले, 'अर्णब प्रचंड शक्तिशाली पत्रकार आहे. अशात मोहिते यांच्या नेतृत्वातील चमूसाठी हा प्लॅन प्रत्यक्षात आणणे अत्यंत आव्हानात्मक होते. अम्ही अत्यंत सावधगिरीने काम करत होतो. चिथावण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही चमूतील प्रत्येक सदस्याने सय्यम बाळगला.'

अर्णब आदित्यनाथांना म्हणाले होते अशिक्षित, पागल; आता देशातील मोठा पत्रकार म्हणत योगींनी केला अटकेला विरोध

...तर अर्णब शहर सोडण्याची होती भीती -त्यांनी सांगितले, की 'या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासातच, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात अर्णबही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. हे एक सीक्रेट मिशन होते. आमच्या लोकांनी अर्णबच्या इमारतीला अनेक चकरा मारल्या. ही गोष्ट लिक झाली, तर अटकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अर्णब शहरही सोडू शकतात,' याची आम्हाला भीती होती. 

प्रत्येक छोट्या गोष्टीचं होतं प्लॅनिंग -या ऑपरेशनसाठी अगदी पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरही लक्ष्य ठेवण्यात आले होते. दरवाजा कोन वाजवणार? हेही निश्चित करण्यात आले होते. एवढेच नाही, तर अर्णब आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कोण बोलेल, विरोध झाल्यास कशा पद्धतीची अॅक्शन करण्यात येईल, अर्णब यांनी प्रतिकारही केला. वाजे यांनी त्यांना तपासात सहकार्य न करण्यासंदर्भातील कायदेशीर पैलूही समजावले. सर्वकाही आरामात पार पडले.

‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

यासंदर्भात, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले, 'मी जेव्हा विधवा आणि त्यांच्या मुलीची व्यथा ऐकली, तेव्हा मला धक्का बसला. असे महाराष्ट्रात होऊ शकते यावर मला विश्वासच बसला नाही. नाईक कुटुंबीयांना आम्ही न्याय देऊ.' एवढेच नाही, तर भाजपने कुठलाही पुरावा नसताना सुशांत प्रकरणाचे राजकारण केले. पण, येथे तर स्पष्टपणे सूइसाईड नोट आहे, असेही देशमुख म्हणाले.

Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर हक्कभंग कारवाई? प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावावर चर्चा

अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकार