सेनेचा दसरा मेळावा; पोलिसांचा फौजफाटा सज्ज

By Admin | Updated: October 22, 2015 02:06 IST2015-10-22T02:06:44+5:302015-10-22T02:06:44+5:30

दादर येथील शिवाजी पार्कमध्ये साजऱ्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येण्याच्या शक्यतेने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

Army's Dussehra rally; Police force ready | सेनेचा दसरा मेळावा; पोलिसांचा फौजफाटा सज्ज

सेनेचा दसरा मेळावा; पोलिसांचा फौजफाटा सज्ज

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमध्ये साजऱ्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येण्याच्या शक्यतेने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मध्य प्रादेशिक परिमंडळाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्तांसह ५०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज आहे. यामध्ये ५० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने येथे येणाऱ्या शिवसैनिकांना डबे, बॅगा व अन्य वस्तू घेऊन येऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहेत. अशा वस्तूंसह शिवाजी पार्कात प्रवेश दिला जाणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येथील सिद्धिविनायक मंदिर ते कापड बाजार, राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, गडकरी चौक येथून केळुस्कर रोड, सेनापती बापट पुतळा येथून दादासाहेब रेगे मार्ग, बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन.
पार्किंगची ठिकाणे
सेनापती बापट मार्ग, फाइव्ह गार्डन, लखमशी नप्पू रोड
येथे पार्किंगला बंदी
एस.व्ही.एस. रोड, केळुस्कर रोड, एम.बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन.सी. केळकर मार्ग. (प्रतिनिधी)

Web Title: Army's Dussehra rally; Police force ready