औरंगाबादमधील खड्डयांमुळे सैन्यदलाचा जवान गंभीर जख्मी
By Admin | Updated: September 11, 2016 14:27 IST2016-09-11T14:27:39+5:302016-09-11T14:27:39+5:30
औरंगाबाद शहरात जागोजागी पडलेले खडडे वाहतुकीचा वेग मंदावण्याबरोबरच अनेक दुर्देवी अपघातांचे कारण ठरत आहेत.

औरंगाबादमधील खड्डयांमुळे सैन्यदलाचा जवान गंभीर जख्मी
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ - औरंगाबाद शहरात जागोजागी पडलेले खडडे वाहतुकीचा वेग मंदावण्याबरोबरच अनेक दुर्देवी अपघातांचे कारण ठरत आहेत. रविवारी आभादेव अशोक जाधव हा भारतीय सैन्यदलातील जवान रस्त्यातील खड्ड्यांमुळे गंभीर जखमी झाला.
सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्तीवर असलेले आभादेव जाधव दुचाकीवरुन रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये आभादेव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाच दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये नगरसेवकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेसाठी पालिका अधिका-यांना जबाबदार धरले. पालिका अधिका-यांना काही नगरसेवकांनी अपशब्द वापरल्याने अधिका-यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. नगरसेवक आणि अधिका-यांमधील वादामुळे खडड्यांचा प्रश्न मात्र तसाच राहिला.