‘सेना नेतृत्व कमजोर!’
By Admin | Updated: October 28, 2014 01:20 IST2014-10-28T01:20:53+5:302014-10-28T01:20:53+5:30
भाजपाला अफझलखानाची फौज म्हणायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्यासमोरच झुकायचे, असे शिवसेनेचे चालले आहे.

‘सेना नेतृत्व कमजोर!’
कणकवली : भाजपाला अफझलखानाची फौज म्हणायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्यासमोरच झुकायचे, असे शिवसेनेचे चालले आहे. शिवसेनेचे आताचे नेतृत्व कमजोर असून, त्यांनी वाघाचा फोटो काढून टाकावा, अशी टीका कणकवलीचे आमदार नीतेश राणो यांनी पत्रकार परिषदेत केली.
राणो म्हणाले, राज्यात सरकार स्थापन करण्यावरून दर दिवशी समीकरणो बदलत आहेत. तर प्रचारसभांमध्ये टीका करणारी शिवसेना आता सत्तेसाठी भाजपासमोर ते झुकत आह़े मुंबई महापालिका हे शिवसेनेचे उत्पन्नाचे साधन आहे. त्याच्यावरच त्यांचे घर चालते, असा घणाघात राणो यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर पक्षांचे नेते अथवा पदाधिकारी आमचे
शत्रू नसून, राजकीय विरोधक
आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका राहील, अशी ग्वाही राणो यांनी दिली़ (वार्ताहर)