सेना उमेदवाराचे अपहरण

By Admin | Updated: February 13, 2017 03:16 IST2017-02-13T03:16:24+5:302017-02-13T03:16:24+5:30

तालुक्यातील सोनीजवळा पंचायत समिती गणातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणारे अरविंद थोरात यांचे ढाकेफळ येथून शनिवारी मध्यरात्री जबर मारहाण

Army kidnapping of the candidate | सेना उमेदवाराचे अपहरण

सेना उमेदवाराचे अपहरण

केज (जि. बीड) : तालुक्यातील सोनीजवळा पंचायत समिती गणातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणारे अरविंद थोरात यांचे ढाकेफळ येथून शनिवारी मध्यरात्री जबर मारहाण करून अपहरण केले. नंतर त्यांना धारुर घाटात सोडून अपहरणकर्त्यांनी पोबारा केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अरविंद थोरात हे शनिवारी दिवसभर प्रचारात व्यस्त होते. रात्री अकरा वाजता ते घरी परतले. नंतर ते दुचाकीवरून आपल्या शेतात जात असताना वाटेत त्यांना जीपमधून आलेल्या चौघांनी अडविले. बेदम मारहाण करून त्यांना जीपमध्ये घालून अपहरण केले. या मारहाणीत थोरात बेशुद्ध पडले. अपहरणकर्त्यांनी थोरात यांना धारुरच्या घाटात फेकून पोबारा केला. डोक्यात खोलवर जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Army kidnapping of the candidate