अरुण गवळीच्या भेटीमुळे अर्जुन रामपालला समन्स
By Admin | Updated: February 3, 2015 11:53 IST2015-02-03T11:50:31+5:302015-02-03T11:53:34+5:30
परवानगीशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची भेट घेतल्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स बजावला आहे.

अरुण गवळीच्या भेटीमुळे अर्जुन रामपालला समन्स
ऑनलाइन लोकमत
मुंबइ, दि. ३ - परवानगीशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची भेट घेतल्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स बजावला आहे. एका चित्रपटात अरूण गवीची भूमिका करणा-या अर्जुनने मागच्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात गवळीची भेट घेतली होती. सुमारे तासभर तो गवळीसोबत होता. मात्र या भेटीसाठी त्याने पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती.
नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून रुटीन चेकअपसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते, तेवहा अर्जुन रामपालने त्याची भेट घेतली. दरम्यान गवळीला रुग्णालयात घेऊन जाणा-या पोलिस पथकाचीही अतंर्गत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.