अर्जुन खोतकर यांचे जालन्यात जोरदार स्वागत
By Admin | Updated: July 11, 2016 22:39 IST2016-07-11T22:39:28+5:302016-07-11T22:39:28+5:30
राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथ विधीनंतर खोतकर सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले.

अर्जुन खोतकर यांचे जालन्यात जोरदार स्वागत
मिरवणुकीने लक्ष वेधले, ठिकठिकाणी भव्य स्वागत, आतषबाजीने शहर दणाणले, मिठाईचे वाटप
जालना: राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथ विधीनंतर खोतकर सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले. त्यांचे आगमन होताच त्यांचे औरंबादपासूनच ठिकठिकाणी उत्स्फूर्त व जल्लोषात स्वागत करण्यात आले. भर पावसातही स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दपारी एक वाजता मोतीबागेपासून राज्यमंत्री खोतकर यांची मिरवणूक निघाली. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खोतकर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी. आ. शिवाजी चौथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, एकनाथ घुगे, जगन्नाथ काकडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
स्वागत आणि आतषबाजी
मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी राज्यमंत्रंी अर्जुन खोतकर यांचे स्वागत व आतषबाजी करण्यात येत होती. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते डीजेच्या तालावर ठेका धरून जल्लोष करत होते. शनि मंदिर, गांधी चमन, टाऊन हॉल, मस्तगड, शिवाजी पुतळा आदी भागात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.