शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

By संतोष आंधळे | Updated: September 12, 2022 08:51 IST

सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  

कोरोना महासाथीसारखा महाभयंकर काळ पाहिल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कमालीचा बदल होईल असे अपेक्षित होते. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरली जाणार, अशी घोषणा करून मोठी वाहवा मिळविली होती. आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील १७,१०५ पदे अद्यापही रिक्त आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार, तर काही राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांची पदे आजही रिक्तच आहेत. कोरोनासारखे अनेक आजार भविष्यात येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.  

रिक्त पदांची संख्या लक्षणीयसार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  सहा सहसंचालक पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उपसंचालकाची एकूण २४ पदे आहेत, त्यापैकी ८ पदे महिनाभरापूर्वीच भरली आहेत. त्यापैकी काही जण ६-७ महिन्यांत निवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर आणखी  १२ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कार्यालयीन आणि प्रशासकीय कामासाठी लागणारी रिक्त पदांची संख्याही लक्षणीय आहे.  

आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सक्षमपणे लढणारा हा विभाग कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पांगळा झाला आहे. आरोग्य विभागाचे यामधील सर्वांत मोठे अपयश म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या नियोजनाची कमतरता येथे जाणवते. योग्य वेळेवर पदोन्नती नाही, त्यामुळे जो अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र आहे तो त्या हक्काच्या पदोन्नतीसाठी फाईल हातात मिरवत मंत्रायलयाच्या चकरा मारून बेजार होतो. लोकांना सोयीनुसार बदल्या दिल्या तर त्या आरोग्य व्यवस्थेला मानवी चेहरा लाभेल. वैद्यकीय अधिकाऱ्यालाच अमानवी पद्धतीने वागणूक दिली तर त्याच्या कामातून तो मानवी वागणूक देईल काय, हा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींचा थेट आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन गरीब रुग्ण यामध्ये भरडला जातो. अर्थपूर्ण बदल्या थांबल्या आणि योग्य पद्धतीने समुपदेशन करून अधिकाऱ्यांना पोषक वातावरण तयार करून काम करण्यास सांगितले तर ते आवडीने काम करतील, मात्र असे होताना दिसत नाही. या विभागात काही जण वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होतात आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त होतात. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका वेळेवर होऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसेल तर त्या कर्मचाऱ्याचे कामात  मन कसे रमेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

... तरच उत्साहाचे वातावरणआरोग्य विभागात सगळेच काही वाईट चालले आहे असे नाही. तो आहे त्या व्यवस्थेत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक गोष्टी वेळेत पूर्ण होत नाही. रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश वर्ग हा सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असतो. त्यांना हक्काच्या आधार वाटणाऱ्या या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा दुष्काळ असल्यासारखी आजची परिस्थिती आहे,  तर नव्यानेच या आरोग्य विभागाची धुरा हातात घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना या मरगळलेल्या विभागाचे केवळ लसीकरण करून चालणार नाही तर त्याला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्साहाचे आणि आनंदी वातावरण विभागात तयार होऊ शकेल.  

टॅग्स :Mantralayaमंत्रालयHealthआरोग्य