‘राजगृह’चा परिसर ना फेरीवाला क्षेत्र
By Admin | Updated: April 8, 2015 01:21 IST2015-04-08T01:21:10+5:302015-04-08T01:21:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले दादर येथील ‘राजगृह’ या वास्तूचा आसपासचा परिसर हा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे

‘राजगृह’चा परिसर ना फेरीवाला क्षेत्र
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले दादर येथील ‘राजगृह’ या वास्तूचा आसपासचा परिसर हा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरीही, येथे अनधिकृत फेरीवाले आढळून आल्यास संबधित पालिका अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
विधानपरिषदेत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ‘राजगृह’ या निवासस्थानाबाहेर अनधिकृत फेरिवाल्यांचा सुळसुळाट झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईतील कोणत्या विभागाचा ना फेरिवाला क्षेत्रात समावेश करायचा याचा निर्णय २४ विभागांच्या सहआयुक्तांची समिती घेते. या समितीने राजगृहाजवळचा परिसर ना फेरिवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ना फेरिवाला क्षेत्रात समावेश करण्याबाबत मुंबई आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीअसून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायर्वाही करण्यात येईल. (प्रतिनिधी)