शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 06:34 IST

खासगी रुग्णालयांबाबत हायकोर्टाची विचारणा : राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांनी पीपीई किट व अन्य उपकरणांसाठी रुग्णांकडून जादा शुल्क आकारू नये, याकरिता नियामक यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये रुग्णांकडून पीपीई किट, हातमोजे व एन९५ मास्क इत्यादी वस्तूंचे अवाजवी शुल्क आकारत असल्यासंदर्भात वकील अभिजित मांगडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होती. याचिकादारांच्या आईला जूनमध्ये ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात सात दिवसांसाठी भरती केले होते. त्या कोरोनाबाधित नव्हत्या. तरीही त्यांच्याकडून पीपीई किट व अन्य वस्तूंचे ७२,८०६ रुपये आकारण्यात आले. अन्य एका रुग्णाला दादरच्या पुनमिया नर्सिंग होममध्ये भरती करण्यात आले. तिथे त्यांच्याकडून पीपीई किट व अन्य वस्तूंसाठी १६ हजार रुपये शुल्क आकारले.

अतिरिक्त सरकारी वकील निशा मेहरा यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारने खाटांचे शुल्क व अन्य वस्तूंचे किमान शुल्क ठरविले आहे, २१ मे रोजी तशी अधिसूचना काढली आहे.रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांवर व नर्सिंग होम्सवर वचक ठेवण्यासाठी कोणती नियामक यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली. ‘पीपीई किट आणि हातमोजांचा बॉक्स केवळ एका रुग्णासाठी वापरण्यात येतो का? अन्य रुग्णांसाठीही वापरण्यात येत असणार. मात्र, प्रत्येक रुग्णाकडून पीपीई किट व हातमोजांच्या बॉक्सची किंमत आकारून रुग्णालय नक्कीच नफेखोरी करीत असणार,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.‘रुग्णाची लुबाडणूक होऊ नये!’महामारीच्या काळात रुग्णालयांकडून रुग्णाची लुबाडणूक होता कामा नये, असे म्हणत न्यायालयाने राज्य सरकार व दोन्ही रुग्णालयांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस