गरिबांच्या करसवलती मान्य नाहीत का? - शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 00:39 IST2017-05-22T00:39:02+5:302017-05-22T00:39:02+5:30
देशात जीएसटी कर लागू करताना गरिबांना लागणाऱ्या वस्तू करमुक्त करण्यात येणार आहेत. ही करमुक्ती मिळू नये, असा विरोधकांच्या बोलण्याचा सूर

गरिबांच्या करसवलती मान्य नाहीत का? - शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात जीएसटी कर लागू करताना गरिबांना लागणाऱ्या वस्तू करमुक्त करण्यात येणार आहेत. ही करमुक्ती मिळू नये, असा विरोधकांच्या बोलण्याचा सूर असल्याची टीका भाजपाचे आ.आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.
ते म्हणाले की, विरोधकांकडून जीएसटीबाबत व्यक्त केली जात असलेली भीती अनाठायी आहे. मुळात एनडीएच्या काळापासून जीएसटीचा विषय होता पण त्यावर देशाचे एकमत त्यांना करता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी ते शक्य करून दाखविले. नुकतेच आपण लंडन येथे अभ्यास दौऱ्यादरम्यान युनायटेड किंगडम बिझनेस कौन्सिलच्या अध्यक्षांशी चर्चा केली. जीएसटी भारतात येत असल्याने ब्रिटनमधील उद्योगपती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.