आर्ची-परशा बनले ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
By Admin | Updated: January 19, 2017 00:20 IST2017-01-19T00:20:26+5:302017-01-19T00:20:26+5:30
‘मतदार नोंदणी करायचं समजत नाय, का इंग्लिशमध्ये सांगू?’ आर्चीच्या आवाजातील हा डायलॉग कानी पडला तर दचकू नका...

आर्ची-परशा बनले ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
मुंबई : ‘मतदार नोंदणी करायचं समजत नाय, का इंग्लिशमध्ये सांगू?’ आर्चीच्या आवाजातील हा डायलॉग कानी पडला तर दचकू नका...कारण मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने चक्क ‘सैराट’ फेम आर्ची-परशा अर्थात, रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे.
महाराष्ट्रातील तरु णवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रि येत मागे आहे. तीन टक्के तरु णाईपैकी फक्त १.१ टक्के तरुण मतदार प्रक्रि येत सहभागी होतात. हा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली आहे. राज्यात ८.३४ कोटी मतदार असून त्यापैकी १२.१६ लाख नोंदणीकृत तरु ण मतदार आहेत.
ही संख्या वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘आर्ची-परशा’ या जोडगळीला आपले ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवले आहे. गावोगावी आता त्यांचे पोस्टर्स झळकणार आहेत. (प्रतिनिधी)