गेबाना नमाज ज्याच्या नावे पढला तो अरीब मजीद परतला
By Admin | Updated: November 29, 2014 22:34 IST2014-11-29T22:34:06+5:302014-11-29T22:34:06+5:30
ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला.

गेबाना नमाज ज्याच्या नावे पढला तो अरीब मजीद परतला
कल्याण : इस्लाम जगतात कधी न घडलेली अभूतपूर्व अशी घटना शुक्रवारी घडली. म्हणजे जो मृत झाला, असे समजून ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला.
कल्याणमधून जे युवक इसीसच्या इराकमधील संघर्षात जिहादी म्हणून गेले होते, त्यापैकी मजीद एक होता. तो इंजिनीअरिंगचा स्टुडंट होता. मे मध्ये तो आपल्या मित्रंसह यात्रेला जाण्याच्या नावाखाली भारताबाहेर पडला होता. शाहीर टंकी, फहाद शेख आणि अमन तांडेल यांच्यासह तो भारतातून बगदादला गेला होता आणि तिथून त्यांनी आपल्या पालकांना आपण इसीससाठी जिहादी होत असल्याची माहिती दिली होती. 26 ऑगस्ट रोजी टंकी याने मजीद एका बॉम्बस्फोटात ठार झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यामुळे तो मरण पावला, असे समजून त्याच्या नावे कुटुंबीयांनी अंतिम नमाज म्हणजे गेबाना नमाजही पढला होता.
युद्ध करीत असताना तीन गोळ्या लागल्याने आपण जखमी झालो, परंतु आता आपली तब्येत ठणठणीत आहे, असे त्याने कुटुंबीयांशी फोनवर बोलताना म्हटले होते. त्याला भेटण्यासाठी त्याचे कुटुंबीय धाव घेते झाले होते. परंतु, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांना भेटीची मनाई
करून फक्त फोनवर बोलण्याची संधी दिली. मजीदच्या मुक्ततेसाठी त्याच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे घातले होते. त्यानंतर, एनआयएने रॉच्या मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यापैकी मजीदला भारतात तुर्कस्तानातून परत आणले. जोर्पयत मजीदची चौकशी पूर्ण होत नाही, तोर्पयत त्याची मुक्तता केली जाणार नसल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी एटीएसच्या अधिका:यांनी शुक्रवारी भेट घेतली. (विशेष प्रतिनिधी)
आमच्या मुलांची माथी भडकाविणा:यांना सजा द्या
ज्यांनी-ज्यांनी कुणी आमच्या मुलांची माथी भडकावली आणि त्यांना हा जीवघेणा खेळ खेळायला लावला, त्या-त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांना सजा द्या, अशी मागणी या युवकांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केली आहे. या घटनेमुळे या तिघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंब आणि परिवारातील 5क् जणांचे जिणो हराम झाले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.
कसा झाला बेपत्ता?
423 मे रोजी तीन मित्रंसह इराकी धर्मस्थळांच्या यात्रेस गेला.
425 मे रोजी तो फालूजा पोहोचला.
426 ऑगस्ट रोजी मजीद बॉम्बस्फोटात ठार झाल्याचा टंकीचा दूरध्वनी.
428 ऑगस्ट रोजी इसीसच्या वेबसाइटवर मजीदचा विवाह रक्का येथे पॅलेस्टिनी युवतीशी झाल्याची माहिती नंतर तो शहीद झाल्याची माहिती
4इसीसच्या वेबसाइटवर अबू-अली-अल-हिंदी या नावाने तो झळकला
4जखमी अवस्थेत तो तुर्कस्तानहून पळाला.
4वडिलांनी एनआयएशी संपर्क साधला व तिनेच त्याला भारतात आणले.
कोण आहे मजीद?
वय : 23 वष्रे
नवी मुंबईमधील इंजिनीअरिंग कॉलेजमधील सिव्हीलचा विद्यार्थी
वडील :डॉक्टर, कल्याणच्या अन्सारी चौकात दवाखाना
बहीण :कल्याणमधील हॉस्पिटलात डॉक्टर
बेपत्ता होण्यापूर्वी:
4डेनिम जीन्सच्या पॅण्ट आणि पाश्चात्त्य धर्तीचे कपडे करून टाकले दान
4मोबाइल फोनचा वापर थांबवला
4बहिणीला नोकरी करण्यास आणि टीव्ही बघण्यास मनाई
4कुटुंबीय इस्लामबाह्य जगत असल्याची टीका करणारे पत्र लिहिले.
4तुम्ही ऐशआरामी आयुष्य जगत असल्याची मला लाज वाटते, असाही पत्रत उल्लेख.
4नगAता आणि उत्तानता याने भरलेले टीव्हीवरील कार्यक्रम बघणा:या स्वता:च्या कुटुंबीयांना लाखोली