शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:27 IST

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील काळात ठरल्या होत्या वादग्रस्त

ठळक मुद्देअलिबाग येथील अधिवेशनाला उध्दव ठाकरे,शरद पवार यांची उपस्थिती  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्रमुख संघटना

बारामती : प्राथमिक शिक्षक महासंघाच्या १३ मार्च रोजी अलिबाग येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्य शासनाने  ९ ते १४  मार्च अशी आठवडाभराची अधिवेशन रजा राज्यातील शिक्षकांना मंजूर केली आहे. यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.तसेच अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह सुप्रिया सुळे, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे हे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्रमुख संघटना आहे.             शिक्षक संघाचे अधिवेशन राष्ट्रीय स्तरावरील असल्याने यावेळी राज्य शासनाने तीन दिवसांऐवजी ९ मार्च ते १४ मार्च अशी सहा दिवसांची अधिवेशन रजा मंजूर केलेली आहे ,याबाबतचे ग्रामविकास मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत,अशी  माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिलीप्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील काळात वादग्रस्त ठरल्या होत्या.परतालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या मूळ तालुक्यात बदल्या करण्याची शिक्षक संघाची मागणी आहे. अधिवेशनातील  घोषणेकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.————————————शिक्षकांच्या मागण्या  प्राथमिक शिक्षकांना १०,२०,३० ही  आश्वाशित प्रगती योजना ,  वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा, संगणक प्रशिक्षण अट शिथिल करणे, जुनी पेन्शन योजना, शाळांसाठी मोफत वीज पुरवठा, वस्तीशाळा शिक्षकांची सलग सेवा , बी एल ओ च्या कामातून वगळणे या मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेTransferबदली