सीबीआय अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी
By Admin | Updated: July 21, 2015 01:17 IST2015-07-21T01:17:02+5:302015-07-21T01:17:02+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अधिकाऱ्याची सहा महिन्यांपूर्वीच

सीबीआय अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अधिकाऱ्याची सहा महिन्यांपूर्वीच बदली झाली असून, पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नसल्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारला नवा अधिकारी नियुक्त करण्याची विनंती करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिषदेत केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपअधीक्षक चौहान यांची फेब्रुवारीत चेन्नईला बदली झाली आहे. याखेरीज या गुन्ह्याशी संबंधित मराठी भाषेतील कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करण्याकरिता चार महिन्यांचा कालावधी लागणार
आहे. (विशेष प्रतिनिधी)