जैव विविधता मंडळावर सदस्यांची नियुक्ती

By Admin | Updated: March 2, 2017 05:47 IST2017-03-02T05:47:55+5:302017-03-02T05:47:55+5:30

राज्य जैविक विविधता नियमामधील तरतुदीनुसार मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointing Members on Biodiversity Board | जैव विविधता मंडळावर सदस्यांची नियुक्ती

जैव विविधता मंडळावर सदस्यांची नियुक्ती


मुंबई : राज्य जैविक विविधता नियमामधील तरतुदीनुसार मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात डॉ. जयंत सुधाकर वडतकर, डॉ. अंकुर अरुण पटवर्धन, डॉ. आरती संजय शनावरे, डॉ. विनय दत्तात्रय देशमुख आणि डॉ. अधिकराव धनाजी जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे. या सदस्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, तिचा वापर करताना जैव विविधता टिकून राहील, तसेच जैविक साधन संपत्तीच्या वापरातून प्राप्त झालेल्या लाभांचे समन्यायी वाटप होण्यासाठी, तसेच तांत्रिक विषयातील तज्ज्ञांमधून पाच नियुक्त्या करावयाच्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Appointing Members on Biodiversity Board