शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

थकीत कर्ज बुडीत करण्याचा नियम शेतक-यालाही लावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 18, 2016 09:18 IST

कर्जबुडव्या उद्योगपतींबाबत जे ‘उदारीकरण’ दाखवले जाते ते सामान्य कर्जबाजारी शेतकर्‍याबाबतही का दाखवले जात नाही ?

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ - उद्योगपतींचे थकीत कर्ज बुडीत करणे हा सरकार आणि बँकांसाठी नेहमीचा तांत्रिक मुद्दा आहे. पण हेच तंत्र-मंत्र सततची नापिकी आणि लहरी निसर्ग यामुळे आत्महत्या कराव्या लागणार्‍या कर्जबाजारी बळीराजाच्या थकीत कर्जाबाबत का वापरले जात नाही? कर्जबुडव्या उद्योगपतींबाबत जे ‘उदारीकरण’ दाखवले जाते ते सामान्य कर्जबाजारी शेतकर्‍याबाबतही का दाखवले जात नाही ? असे सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारले आहेत. 
 
कर्ज बुडवणा-या उद्योगपतींवर स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखवलेल्या उदारतेवरुन आजच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मल्ल्या यांच्यासह इतर उद्योगपतींचे थकीत कर्ज बुडीत ठरविले गेले. म्हणजे कर्जबुडवे उद्योगपती तुपात आणि जनता जात्यात असाच हा प्रकार असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
उद्योगपतींकडे असलेली एकूण ७० हजार कोटींची थकबाकी फेडण्यासाठी ही मंडळी योग्य वेळी बँकांमध्ये रांगेत उभी राहिली असती तर ना आपली अर्थव्यवस्था ढासळली असती, ना नोटाबंदीचा निर्णय घ्यावा लागला असता ना देशाच्या १२५ कोटी जनतेला आपल्याच पैशासाठी तासन्तास रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ आली असती असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- थकीत आणि बुडीत कर्जाचा डोंगर गेल्या काही दशकांत वाढतच गेल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अर्थकारण ढेपाळले आहे. तरीही मल्ल्या यांच्यासह इतर उद्योगपतींचे थकीत कर्ज बुडीत ठरविले गेले. म्हणजे कर्जबुडवे उद्योगपती तुपात आणि जनता जात्यात असाच हा प्रकार म्हणावा लागेल. कर्जबुडव्या उद्योगपतींना दिले जाणारे बुडीत कर्जाचे ‘वरदान’ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीच ‘शाप’ ठरले आहे. तरीही ते पुन्हा दिले गेले. विशेषत: केंद्र सरकारने देशातील काळ्या पैशाविरुद्ध कठोर पावले उचलली असताना असे काही घडणे अडचणीचे ठरू शकते याची जाणीव सरकारने ठेवणे हिताचेच ठरेल. 
 
- नो टाबंदीच्या निर्णयामुळे देशात दहा दिवसांपासून सुरू असलेला आर्थिक गोंधळ अद्याप थांबलेला नाही. सामान्य जनतेच्या बँका आणि एटीएमबाहेरील रांगा कमी झालेल्या नाहीत. या रांगांमध्ये होणार्‍या ‘नोटाबळीं’चा आकडाही दररोज वाढतच जात आहे. सामान्य माणूस असा मेटाकुटीला आलेला असताना तिकडे कर्ज फेडायची ऐपत असूनही शेकडो कोटींचे कर्ज बुडविलेल्या उद्योगपतींबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया मात्र ‘उदार’ झाली आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्यासह ६३ थकबाकीदार उद्योगपतींचे सुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज ‘बुडीत’ असल्याचे स्टेट बँकेने जाहीर केले आहे. ही संपूर्ण थकबाकी बँकेने ‘अ‍ॅडव्हान्स अंडर कलेक्शन अकाऊंट’ (एयूसीए) खात्यात वर्ग केल्याचे समोर आले आहे. 
 
- सरकार आणि बँकेने ही ‘कर्जमाफी’ नाही असे सांगितले आहे, पण यावर जनतेचा विश्‍वास बसणार कसा! सामान्य माणसाला आज त्याच्याच बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पुन्हा त्याने किती पैसे काढायचे यावरही सरकारने ‘राशन’ लावले आहे आणि तिकडे अनेक उद्योगपतींनी देशाला लावलेला हजारो कोटींचा ‘चुना’ आज बँकांनाच साफ करावा लागत आहे. सरकार आणि बँकेच्या दृष्टीने थकीत कर्ज अशा पद्धतीने बुडीत करणे हा नेहमीचा तांत्रिक मुद्दा आहे. पण हेच तंत्र-मंत्र सततची नापिकी आणि लहरी निसर्ग यामुळे आत्महत्या कराव्या लागणार्‍या कर्जबाजारी बळीराजाच्या थकीत कर्जाबाबत का वापरले जात नाही? 
 
- कर्जबुडव्या उद्योगपतींबाबत जे ‘उदारीकरण’ दाखवले जाते ते सामान्य कर्जबाजारी शेतकर्‍याबाबतही दाखवायला काहीच हरकत नाही. सरकार आणि स्टेट बँक म्हणते त्याप्रमाणे ६३ उद्योगपतींच्या थकीत कर्जाच्या वसुलीची प्रक्रिया सुरूच राहील हे गृहीत धरले तरी अशी वसुली कधीच होत नाही. अनेकदा अशी कर्जे बुडीत म्हणून ‘अक्कलखाती’ जमा होतात असाच आजवरचा सर्वसाधारण अनुभव आहे. ज्या विजय मल्ल्याचे नाव या ६३ थकबाकीदार उद्योगपतींमध्ये आहे त्या महाशयांच्या अनेक मालमत्ता मागील काळात सरकारने ‘अ‍ॅटॅच’ केल्या आहेत. 
 
- त्याच्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या विमानांचा ताफा जप्त केला, पण अद्याप शून्य पैसाही वसूल होऊ शकलेला नाही. त्याची कारणे काहीही असतील. मल्ल्या परदेशात मजेत आहे आणि इकडे बँका त्याच्याकडील वसुलीसाठी वणवण करीत आहेत. स्टेट बँकेने आता जे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत दाखवले त्यात १२०० कोटी या मल्ल्या महाशयांचे आहेत. म्हणजे हा मल्ल्याच्या थकबाकीच्या गळफासातून स्वत:ची मान सोडवून घेण्याचा प्रकार म्हणायचा का?
 
- या ६३ उद्योगपतींचे बुडीत सात हजार कोटी काय किंवा उद्योगपतींकडे असलेली एकूण ७० हजार कोटींची थकबाकी काय, ही सर्व मंडळी योग्य वेळी कर्ज परतफेडीसाठी बँकांमध्ये रांगेत उभी राहिली असती तर ना आपली अर्थव्यवस्था ढासळली असती, ना नोटाबंदीचा निर्णय घ्यावा लागला असता ना देशाच्या १२५ कोटी जनतेला आपल्याच पैशासाठी तासन्तास रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ आली असती. बँकांकडील थकीत कर्जाची रक्कम ५०-५५ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. थकीत आणि बुडीत कर्जाचा डोंगर गेल्या काही दशकांत वाढतच गेल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अर्थकारण ढेपाळले आहे. तरीही मल्ल्या यांच्यासह इतर उद्योगपतींचे थकीत कर्ज बुडीत ठरविले गेले. म्हणजे कर्जबुडवे उद्योगपती तुपात आणि जनता जात्यात असाच हा प्रकार म्हणावा लागेल.
 
- कर्जबुडव्या उद्योगपतींना दिले जाणारे बुडीत कर्जाचे ‘वरदान’ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीच ‘शाप’ ठरले आहे. तरीही ते पुन्हा दिले गेले. विशेषत: केंद्र सरकारने देशातील काळ्या पैशाविरुद्ध कठोर पावले उचलली असताना असे काही घडणे अडचणीचे ठरू शकते याची जाणीव सरकारने ठेवणे हिताचेच ठरेल. आधीच नोटाबंदीमुळे सामान्य माणसाला होत असलेल्या प्रचंड मनस्तापाचे ‘गालबोट’ सरकारच्या काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला लागले आहे. त्यात बुडीत कर्जाच्या निमित्ताने आणखी भर नको इतकेच!