लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू
By Admin | Updated: October 12, 2014 00:36 IST2014-10-12T00:36:35+5:302014-10-12T00:36:51+5:30
लोकमत इम्पॅक्ट : पर्यटन क्लबची स्थापना

लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू
लोणार : खार्या पाण्याच्या जागतिक ख्यातीच्या सरोवरासह प्राचिन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आणि राज्यातील महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांमध्ये गणना होणार्या लोणार ये थील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन महामंडळाने ह्यन्याहरी निवास योजनाह्ण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेबाबत जनजागृती होऊन, तिच्या यशस्वितेसाठी स्थानिकांचा प्रतिसाद मिळण्याच्या हेतूने पर्यटन क्लबचीही स्थापना करण्यात आली आहे. ३0 सप्टेंबरला (पर्यटन दिन) ह्यलोकमतह्णने न्याहरी योजनेपासून लोणार वंचित असल्याबाबत वृत्त दिले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती येथील प्रादेशिक महाव्यवस्थापकांनी लोणारला ह्यन्याहरी निवास योजनाह्ण कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.
लोणारच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भगवानबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यटन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासात स्थानिकांचा सहभाग वाढणार असून, स्थानिकांना रोजगाराची संधीही प्राप्त होणार आहे. न्याहरी निवास योजनेमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती व खाद्यपदार्थांंची ओळख होईल. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मैत्री संबंध दृढ होण्यास मदत होतील. न्याहरी निवास योजनेत पर्यटकांसाठी करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक उत्पादनास बाजारपेठ मिळू शकेल.