पदवीधर नोंदणी व पडताळणीसाठी विशेष कार्यक्रम राबवा
By Admin | Updated: May 6, 2014 22:07 IST2014-05-05T22:19:02+5:302014-05-06T22:07:56+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील मतदार यादी नोंदणी व पडताळणीसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.

पदवीधर नोंदणी व पडताळणीसाठी विशेष कार्यक्रम राबवा
विद्यापीठ विकास मंचची मागणी
औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील मतदार यादी नोंदणी व पडताळणीसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात लोकसभेसाठी नुकतेच मतदान झाले. त्यात मतदार याद्यातील घोळ, मतदारांची नावे गायब होणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. पदवीधर मतदारसंघात ही चूक होऊ नये यासाठी मतदार नोंदणी व पडताळणीचा विशेष कार्यक्रम राबवावा.
बुधवारी यासंदर्भात अधिकार्यांची बैठक घेऊन त्यावर विचार करण्याचे आश्वासन निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार फड यांनी या शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात प्रा. गजानन सानप, परमेश्वर हसबे, प्रा. पूनमचंद्र भोसले, प्रा. राम बुधवंत, बलराज कुलकर्णी आदींचा सहभाग होता.