अॅट्रॉसिटी वगळण्याबाबत अर्ज
By Admin | Updated: November 30, 2014 01:21 IST2014-11-30T01:21:56+5:302014-11-30T01:21:56+5:30
प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम वगळावे, असा अर्ज तपास अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी पाथर्डी न्यायालयात सादर केला आहे.

अॅट्रॉसिटी वगळण्याबाबत अर्ज
पाथर्डी (जि. अहमदनगर) : संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित समाजातील तिघांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम वगळावे, असा अर्ज तपास अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी पाथर्डी न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे हत्याकांडाच्या तपासाला गती येईल, अशी शक्यता व्यक्त झाली आहे. पोलिसांनी या घटनेत अॅट्रॉसिटीचे कलम लावले कसे? याबाबत अनेक दिवसांपासून जाहिरपणो नाराजी व्यक्त केली जात होती.
जवखेडे खालसा येथील वस्तीवर 2क् ऑक्टोबरच्या रात्री दलित कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. ही घटना 21 ऑक्टोबरला दुपारी उघडकीस आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. सर्वच राजकीय पक्षांचे जबाबदार नेते मंडळींनी जवखेडे खालसा येथे भेट देऊन या घटनेचा निषेध केला होता. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. ही घटना घडून सव्वा महिना झाला तरी अद्याप पोलीस आरोपीर्पयत पोहचले नाहीत. पोलिसांनी आतापयर्ंत गावातील सुमारे दीडशे व्यक्तींची चौकशी केली. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांवर मोठय़ा प्रमाणावर दबाव आहे. परंतु ठोस पुरावा पोलिसांना मिळला नाही.
या घटनेत पोलिसांनी अॅट्रॉसिटीचे कलम लावले होते. त्या कलमावरून बरेच रणकंदन झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आरोपी पकडले नाहीत तर अॅट्रॉसिटीचे कलम पोलिसांनी कसे लावले? याविषयी शंका उपस्थित केली होती. तसेच भेट देणा:या अनेकांनी सदर कलम लावण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले होते. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी न्यायालयात या प्रकरणात अॅट्रॉसिटीचे लावलेले कलम वगळण्यात यावे, असा अर्ज सादर केला आहे. (प्रतिनिधी)