कुलगुरू पदासाठी अर्ज मागविले
By Admin | Updated: April 8, 2015 01:49 IST2015-04-08T01:49:37+5:302015-04-08T01:49:37+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ ७ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कुलगुरू पदाची नियुक्ती

कुलगुरू पदासाठी अर्ज मागविले
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ ७ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कुलगुरू पदाची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी शोध समिती गठीत केली आहे. कुलगुरूपदासाठी शोध समितीने अर्ज मागवले असून, इच्छुकांना १५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
कुलगुरूपदासाठी सुयोग्य व्यक्तीच्या नावाची शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण हे या समितीचे अध्यक्ष तर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी आणि निरी संस्थेचे संचालक डॉ. सतीश वाटे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या समितीमार्फत कुलगुरू
पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जाचा नमुना मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शोध समितीने डॉ. मधू मदान यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. इच्छुक उमेदवारांना सिम्बॉयसिस दूरशिक्षण अध्ययन केंद्र, १0६५, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे या पत्त्यावर १५ मेपर्यंत अर्ज करता
येतील. (प्रतिनिधी)