पोलिसांवर आरोप करणाऱ्या अर्जाचा निकाल ६ मे रोजीच

By Admin | Updated: April 24, 2015 01:23 IST2015-04-24T01:23:06+5:302015-04-24T01:23:06+5:30

हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा बचाव करण्यासाठी खोटे पुरावे सादर केले असून, यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,

The application of the charges against the police on May 6 | पोलिसांवर आरोप करणाऱ्या अर्जाचा निकाल ६ मे रोजीच

पोलिसांवर आरोप करणाऱ्या अर्जाचा निकाल ६ मे रोजीच

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा बचाव करण्यासाठी खोटे पुरावे सादर केले असून, यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे़ या अर्जावर येत्या ६ मे रोजीच न्यायालय निर्णय देणार आहे़
घटना घडताना सलमानसोबत असलेल्या गायक कमाल खानचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे़ त्यात त्याने सलमानच गाडी चालवत होता, असे म्हटले आहे़ मात्र जाणीवपूर्वक कमाल खानची साक्ष नोंदवण्यात आली नाही़ खटल्यातील खोट्या पुराव्यांसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या अर्जात करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The application of the charges against the police on May 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.