5क् हजारांवर अर्जदार म्हाडा सोडतीस पात्र
By Admin | Updated: June 1, 2014 01:06 IST2014-06-01T01:06:40+5:302014-06-01T01:06:40+5:30
म्हाडाच्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे.

5क् हजारांवर अर्जदार म्हाडा सोडतीस पात्र
>मुंबई : म्हाडाच्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे. लॉटरीत सहभागी होणा:या इच्छुकांची संख्या एका दिवसात 1क् हजारांनी वाढली असून अनामत रक्कम भरणा:यांचा आकडा 5क् हजारापर्यत पोहचला आहे.
नव्या नियोजनाप्रमाणो 25 जूनला लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदण्यासाठी 7 जून तर ऑनलाईन अर्ज व डी.डी.द्वारे रक्कम भरण्यासाठी अनुक्रमे 9 व 11 जूनपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे.
म्हाडाकडून या वर्षी मुंबई, विरार व वेगुल्र्यातील एकूण 2641 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. मात्र त्यासाठीच्या किमती खासगी बाजारभावाप्रमाणो असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होवून त्यांनी त्याकडे दुलक्र्ष केले होते. लोकसभेतील पराभवानंतर राज्य सरकारने अब्रू जाऊ नये, यासाठी किंमतीमध्ये गटनिहाय काही प्रमाणात कपात केली आहे. उत्पन्न गटनिहाय सरासरी 75 हजार ते 4 लाखापर्यत दर कमी झाल्याने इच्छुकांनी लॉटरीमध्ये नशीब आजमाविण्याला भर दिला आहे.त्यासाठी आज रात्री आठ वाजेपर्यत नाव नोंदणी करणा:यांची संख्या 89 हजार 643पर्यत झाली होती. त्यापैकी मुंबईतून 78 हजार, 366 जणांनी तर कोकण बोर्डात 9 ,159 असे एकुण 87 हजार 525 जणांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. पेंमट भरणा:यांची संख्या दोन्ही मंडळामध्ये अनुक्रमे 44 हजार 826 व 5,111 अशी एकूण 49,937 इतकी आहे.