शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागा; उच्च न्यायालयाने नामांतराविरोधातील याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 21:25 IST

महाविकास आघाडी सरकारच्या २९ जूनच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतरण ‘संभाजीनगर’ असे केले. त्यानंतर नव्या सरकारचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती देऊन पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नवे नामांतर केले.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमच्याकडे येण्याऐवजी औरंगाबाद खंडपीठात दाद मागा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

ही याचिका औरंगाबादचे रहिवासी मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी दाखल केली होती. इंग्रजांपासून या शहराचे नाव औरंगाबाद आहे. आता केवळ राजकीय फायद्यासाठी हे नाव बदलण्यात येत आहे, असा या याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. 

महाविकास आघाडी सरकारच्या २९ जूनच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतरण ‘संभाजीनगर’ असे केले. त्यानंतर नव्या सरकारचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती देऊन पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नवे नामांतर केले. तथापि, ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने बेकायदा त्यांच्या सरकारच्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत राजकीय कारणांसाठी ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने जनभावनेचा विचार न करता व राज्यघटनेतील तरतुदींची अवहेलना करून मागील सरकारच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. 

याचिकेतील आरोप काय?औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहराची संस्कृती समृद्ध आहे. शिवसेनेसारखे राजकीय पक्ष या शहराचे नामांतर करून राजकीय फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या शहराचे नाव बदलून नागरिकांमध्ये मुस्लीम नागरिकांविरोधात द्वेष निर्माण करणे व त्याद्वारे राजकीय फायदा घेण्याचा विचार या राजकीय पक्षांचा आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय