कारागृहात जेरबंद असलेल्या गुन्हेगारानं भरला उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: February 3, 2017 18:53 IST2017-02-03T18:53:24+5:302017-02-03T18:53:24+5:30
पिंपरीतील एका गुन्हेगाराने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला

कारागृहात जेरबंद असलेल्या गुन्हेगारानं भरला उमेदवारी अर्ज
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 3 - महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम २००५ अन्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या पिंपरीतील एका गुन्हेगाराने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अरविंद साबळे (वय ३५, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, सध्या तो कळंबा कारागृहात जेरबंद आहे. दरम्यान, शुक्रवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे तो न्यायालयाच्या परवानगीने प्रभाग क्रमांक १९ मधून अर्ज दाखल करण्यासाठी आला होता.
साबळे अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने ब क्षेत्रीय कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात साबळे याला कार्यालयात आणले. अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.