शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 19:01 IST

Appasaheb Deshmukh ED: श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली.

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सक्तवसूली संचलनालयानं (ED) ही कारवाई केली. त्यांनी एमएलए न्यायालयानं २४ जूनपर्यंत ईडीकडे कोठडी सुनावली आहे.

यापूर्वीही ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई करत श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता अप्पासाहेब देशमुखांना अटक करण्यात आली. महादेव देशमुख आणि अप्पासाहेब देशमुख हे भाऊ आहेत. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत त्यांच्याकडून प्रवेशासाठी पैसे गोळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संस्थेला २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २०० विद्यार्थ्यांसाठी एबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०१४ मध्ये मात्र प्रवेश प्रस्ताव फेटाळण्यात आला. २०० प्रवेशाची परवानगी असताना २०० ऐवजी ५५० विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले आणि त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच नाही. प्रवेश आणून देण्यासाठी एका एजन्टचीही नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष महादेव देशमुक आणि इतरांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय