शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या अनुराधा आठवले यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:15 IST

परिचारिकांच्या गणवेषाचे भारतीयकरण, गुलाबी रंग मिळण्यासाठी अनुराधा आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

ठळक मुद्देपरिचारिकांच्या अनेक प्रश्नांबाबत शासन पातळीवर सक्रिय१९६४ मध्ये परिचारिका म्हणून ससून रुग्णालयात रूजू

पुणे : शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ऑल इंडिया गव्हर्नमेंट फेडरेशन व महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. परिचारिकांच्या गणवेशाचे भारतीयकरण, गुलाबी रंग मिळण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अनेक प्रश्नांबाबत शासन पातळीवर परिचारिकांच्या मागण्यांसाठी सक्रिय होत्या. मागील काही दिवसांपासून त्या मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. आठवले या १९६४ मध्ये परिचारिका म्हणून ससून रुग्णालयात रूजू झाल्या होत्या. पुढील दोन वर्षातच त्यांनी परिचारिकांच्या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी त्यांना स्वत:ला पगारी रजेसाठी प्रशासनाकडे भांडावे लागले होते. या घटनाच संघटनेच्या उभारणीसाठी कारणीभुत ठरली. मार्च १९६६ मध्ये त्यांनी संघटनेची पहिली औपचारिक बैठक घेतली. त्यानंतर परिचारिकांच्या हक्कासाठी त्या सातत्याने लढत राहिल्या.संघटनेला १९७५ मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे स्वरूप मिळाले. पुर्वी परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा गणवेश होता. हा गणवेश बदलून त्याचे भारतीयकरण करणे तसेच गणवेश गुलाबी रंगाचा करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा यशस्वी ठरला. जवळपास १५ वर्ष त्यांनी याचा पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे विनाकारण बदल्यांचा प्रश्न, संसारी परिचारिकांच्या अडचणी, रजा, तात्पुरत्या स्वरूपातील परिचारिकांचे तोकडे वेतन, रजांचे फायदे, त्यांना सेवेत सामावून घेणे, परिचारिकांना सुरक्षिततेची हमी, एक दिवसाची रात्रपाळी, वेतन वाढीत सुधारणा असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. विविध मागण्यांसाठी त्यांनी शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांना संघटित करून अनेकदा संपाही पुकारला. संघर्षाच्या काळात त्यांना ६६ महिने बिनपगारी राहावे लागले. मागील वर्षी जून महिन्यामध्ये ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतरच शासकीय रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी मेस्मा लागु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतले. आठवले यांच्या लढ्यातील हे अखेरचे आंदोलन ठरले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरGovernmentसरकार