‘अॅन्टिलिया’च्या व्यवहाराची न्यायप्रविष्ठ म्हणून बोळवण!
By Admin | Updated: April 11, 2015 00:08 IST2015-04-11T00:08:50+5:302015-04-11T00:08:50+5:30
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानिया यांच्या मुंबईतील अन्टीलिया या निवासी इमारतीची जमीन वक्फची होती. करिमभाई इब्राहिमभाई

‘अॅन्टिलिया’च्या व्यवहाराची न्यायप्रविष्ठ म्हणून बोळवण!
मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानिया यांच्या मुंबईतील अन्टीलिया या निवासी इमारतीची जमीन वक्फची होती. करिमभाई इब्राहिमभाई अनाथालयाची ही जमीन अॅन्टिलिया कमर्शियल प्रा.लि.या कंपनीला विकण्यात आली. या बेकायदेशीर व्यवहारास वक्फ मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष एम.ए.अजीज (आता मृत), तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल आणि एस.एस.अली कादरी जबाबदार असल्याचे आयोगाने म्हटले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे वक्फ बोर्डाला निर्देश देण्यात यावेत एवढेच कृती अहवालात म्हटले आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनींमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या ए.टी.ए.के.शेख समितीच्या अहवालावरील कृती अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. वक्फ जमिनींची गेली काही वर्षे कशी लूट करण्यात आली याची धक्कादायक माहिती शेख समितीने दिली. त्यावरमुळे कृती अहवालात शासनाने काही आजी-माजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यात
बऱ्याच प्रकरणांमध्ये वक्फ बोर्डाचे तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल यांचा समावेश आहे. ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. शेख समितीच्या अहवालात नमूद केलेली घोटाळ्यांची बहुतेक प्रकरणे ही मराठवाड्यातील आहेत.
औरंगाबादेत बेकायदेशीर व्यवहार
औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशननजीक असलेल्या शाह शैकतमिया दर्ग्याची ३ एकर ३ गुंठे जमीन सुफा शिक्षण संस्थेला
वक्फ मंडळाच्या दोन तृतियांश सदस्यांच्या अनुमतीशिवाय २००६ मध्ये देण्यात आली. या बेकायदेशीर व्यवहारासाठी वक्फ बोर्डाचे तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल व अध्यक्ष डॉ. एम. ए. अजीज यांना जबाबदार धरण्यात आले आहे. पटेल यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)