अटकपूर्व जामीन फेटाळला
By Admin | Updated: February 10, 2015 02:23 IST2015-02-10T02:23:22+5:302015-02-10T02:23:22+5:30
ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीप्रकरणी अटकेच्या भीतीने बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता राजेंद्र टी़़ पाटील यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

अटकपूर्व जामीन फेटाळला
नाशिक : ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीप्रकरणी अटकेच्या भीतीने बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता राजेंद्र टी़़ पाटील यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
पार्टीसाठी परवानगी देताना पाटील यांनी नियमानुसार स्थानिक पोलिसांची परवानगी अथवा अभिप्राय न घेतल्याने हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगाशी येण्याची चिन्हे आहेत़ सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता पी़ वाय़ देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ओझर विमानतळावर ठेकेदार विलास बिरारी यांनी पार्टी दिली होती. दिंडोरी पोलीस ठाण्यात बिरारी, डीजे व मंडपचालक सुनील ढगे, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोघांना अटक केल्यावर जामीन मिळाला. (प्रतिनिधी)