घातपात रोखण्यासाठी अॅन्टी टेररिस्ट सेल सक्रिय
By Admin | Updated: August 27, 2014 04:22 IST2014-08-27T04:22:11+5:302014-08-27T04:22:11+5:30
दहशतवादी-घातपाती कारवायांची माहिती घेण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्याच्या पातळीवर स्थापन झालेले अॅन्टी टेररिस्ट सेल सक्रिय झाले आहेत

घातपात रोखण्यासाठी अॅन्टी टेररिस्ट सेल सक्रिय
मुंबई : दहशतवादी-घातपाती कारवायांची माहिती घेण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्याच्या पातळीवर स्थापन झालेले अॅन्टी टेररिस्ट सेल सक्रिय झाले आहेत.
सीम काडर््सची विक्री, नव्याने येणारे भाडेकरू, पासपोर्ट-रेशनिंग एजंटांकडून हे सेल वेळोवेळी माहिती घेत आहेत. तसेच परिसरातील संवेदनशील ठिकाणांची गस्त, नाक्यानाक्यावर घडणाऱ्या चर्चांमधील नेमकी माहिती वेचत आहेत. शिवाय अभिलेखावरील गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर हद्दपारीसह अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी सांगितले.
वाहतूक विभागाचे सहआयुक्त बी. के. उपाध्याय यांनी गणेशोत्सव काळात विशेषत: विसर्जनादिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू, वांद्रे, पवई तलाव या पाच मोठ्या विसर्जन केंद्रांवर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षात सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग होईल. तसेच ३७ ठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात येतील. तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील ४९ रस्ते बंद ठेवण्यात येतील, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)