चव्हाण यांच्याबाबतच्या याचिकेस उत्तर द्या

By Admin | Updated: June 21, 2014 01:25 IST2014-06-21T01:25:08+5:302014-06-21T01:25:08+5:30

येत्या चार आठवडय़ात प्रत्युत्तर सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिल़े

Answer to Chavan's petition | चव्हाण यांच्याबाबतच्या याचिकेस उत्तर द्या

चव्हाण यांच्याबाबतच्या याचिकेस उत्तर द्या

>आदर्श घोटाळा : हायकोर्टाचा सीबीआयला आदेश
 
मुंबई : वादग्रस्त आदर्श सोसायटी इमारत घोटाळ्याप्रकरणी  माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्यावरही फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणा:या याचिकेचे येत्या चार आठवडय़ात प्रत्युत्तर सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिल़े
महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून खासदार चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाल क़े शंकरनारायणन् यांनी मंजूरी दिलेली नाही़ तेव्हा आता त्यांना आरोपी करता येणार नाही, असा दावा  सीबीआयने केला़
 मात्र आदर्श घोटाळ्याच्या तपासावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण आह़े त्यामुळे यातील आरोपींविरोधात खटला सुरू करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने सीबीआयला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिल़े
सर्व नियम धाब्यावर बसवून उभी राहिलेल्या आदर्श सोसायटीच्या इमारतीवर खासदार चव्हाण यांनी महाराष्ट्रात मंत्री असताना मेहरनजर केली होती़ त्यामुळे त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झालीच पाहिज़े तसेच या सोसायटीत बेनामी 
फ्लॅट असून त्याची देखील चौकशी करावी, अशी मागणी तिरोडकर 
यांनी याचिकेत केली आह़े (प्रतिनिधी)

Web Title: Answer to Chavan's petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.