अन्सल बंधूंचा तुरुंगवास टळला; 60 कोटींचा दंड
By Admin | Updated: August 20, 2015 01:24 IST2015-08-20T01:23:04+5:302015-08-20T01:24:16+5:30
उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी

अन्सल बंधूंचा तुरुंगवास टळला; 60 कोटींचा दंड
नवी दिल्ली : उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याची मागणी फेटाळून लावली. पण अन्सल बंधूंना तीन महिन्यांच्या आत प्रत्येकी 3क् कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही दिले.
13 जून 1997 रोजी ह्यबॉर्डरह्ण या चित्रपटाचा खेळ चालू असताना दक्षिण दिल्लीतील ग्रीनपार्कस्थित उपहार चित्रपटगृहात आग लागली होती. बाल्कनीत अडकलेल्या 59 प्रेक्षकांचा गुदमरून मृत्यू झाला होता, तर चेंगचेंगरीत शंभराहून अधिक प्रेक्षक जखमी झाले होते.
अन्सल बंधूंनी एव्हाना भोगलेल्या तुरुंगवासाच्या कालवधीर्पयतच त्यांची कारावासाची शिक्षा मर्यादित करून न्या. ए.आर. दवे, कुरियन जोसेफ आणि आदर्श कुमार गोयल यांच्या न्यायपीठाने दोन्ही भावांना जबर दंड भरण्याचा आदेश दिला. दिल्ली सरकार ही रक्कम कल्याणकारी योजनांवर खर्च करील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तब्बल 23 लहान मुलांसह 59 जणांचा जीव अन्सल बंधूंच्या निष्काळजीपणामुळे गेला, आणि या दोघांनी सुनावण्यात आलेली शिक्षाही पुरती भोगलेली नाही. दोन वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आल्यावरही सुशीलने पाच महिने व गोपालने केवळ 142 दिवस तुरुंगात काढले. त्यामुळे अन्सल बंधूंना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविण्याची विनंती सीबीआयच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केली; परंतु न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. उपहार दुर्घटना पीडित संघटनेच्या वतीने के.टी.एस. तुलसी यांनी तर अन्सल बंधूंची शिक्षा आणखी वाढविण्याची मागणी केली.
यापूर्वी, न्या. तीरथ सिंह ठाकूर आणि ज्ञान सुधा मिश्र (आता सेवानिवृत्त) यांच्या न्यायपीठाने 5 मार्च 2क्14 रोजी अन्सल बंधूंना दोषी ठरविले होते. तथापि, दोघांच्या शिक्षेबाबत न्यायधीशांत मतैक्य नव्हते. न्या. ठाकूर दिल्ली उच्च न्यायालयाने 2क्क्8 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या बाजूने होते. उच्च न्यायालयाने अन्सल बंधूंना एक-एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती; परंतु न्या. मिश्र यांनी सुशील अन्सल यांच्या वयाचा विचार करून त्यांनी भोगलेल्या तुरुंगवासार्पयत शिक्षा मर्यादित केली होती. तथापि, गोपाल यांची शिक्षा वाढवून दोन वर्षे केली होती. त्यानंतर हे प्रकरण तीन सदस्यीय न्यायपीठाकडे निर्णयासाठी वर्ग करण्यात आले होते.
बुधवारच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी या अग्निकांडप्रकरणी दिल्ली विद्युत मंडळाच्या कर्मचा:यांवर आरोप केला. घटना घडली त्या दिवशी ट्रॉन्सफॉर्मरमध्ये किरकोळ आग लागली होती. दिल्ली विद्युत मंडळाने ही आग विझविण्यासाठी तज्ज्ञ न पाठविता साधा मिस्त्री पाठविला. दोषसिद्धीविरुद्ध तुम्ही युक्तिवाद करू शकत नाही. शिक्षेच्या कालावधीबाबतच तुमचे म्हणणो ऐकून घेतले जाईल. आव्हान द्यायचे असेल, तर फेरविचार याचिका दाखल करा, असे न्यायपीठाने जेठमलानी यांना सांगितले.
दोषींची शिक्षा कमी करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने आव्हान देत अपील दाखल केले होते