गणेशोत्सवासाठी आणखी विशेष ट्रेन
By Admin | Updated: September 8, 2015 02:07 IST2015-09-08T02:07:54+5:302015-09-08T02:07:54+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव
गणेशोत्सवासाठी आणखी विशेष ट्रेन
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव अशी आरक्षित ट्रेन सोडण्यात येईल.
ट्रेन नंबर 00११८ रत्नागिरीहून १४, १९, २२, २३, २४ आणि २९ सप्टेंबर रोजी ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी वसई रोड येथे १३.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षण ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
ट्रेन नंबर 00११७ वसई
रोडहून १३, १४, १८, १९, २१, २२, २३, २८, २९ सप्टेंबर रोजी १३.४५ वाजता
सुटेल आणि त्याच दिवशी रत्नागिरी येथे २२.00 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा व पनवेल स्थानकात थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 00११२ मडगावहून ११, १६, २१, २६ सप्टेंबर रोजी 00.१५ वाजता सुटेल आणि वसई रोड येथे १३.00 वाजता त्याच दिवशी पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षणही ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ट्रेन नंबर 00१११ वसई रोडहून २४ सप्टेंबर रोजी १३.४५ वाजता सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ३.00 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा व पनवेल स्थानकांत थांबा देण्यात येईल.