सांताक्रूझमध्ये पत्रकारांना मारहाणीप्रकरणी आणखी एकाला अटक
By Admin | Updated: July 17, 2015 11:52 IST2015-07-17T11:51:33+5:302015-07-17T11:52:12+5:30
सांताक्रूझमधील आगीचे वार्तांकन करणा-या मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण व छेडछाडीप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सांताक्रूझमध्ये पत्रकारांना मारहाणीप्रकरणी आणखी एकाला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - सांताक्रूझमधील आगीचे वार्तांकन करणा-या मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण व छेडछाडीप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अयाज असे त्याचे पोलिसांनी काल रात्री उशीरा त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी सलमान शेखला याधीच अटक केली होती, त्यामुळे आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचा आकडा दोनवर पोचला आहे.
काय आहे नेमके प्रकरण
सांताक्रूझमध्ये काल सिलिंडर स्फोट होऊन चार जण ठार झाले, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्राच्या काही महिला पत्रकार तसेच फोटोग्राफरना स्थानिक गुंडांकडून मारहाण करण्यात आली. तसेच महिला पत्रकारांना पाहून अश्लील शेरेबाजी आणि धक्काबुक्कीही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.