मराठा नावाने आणखी एका पक्षाची स्थापना
By Admin | Updated: January 18, 2017 12:37 IST2017-01-15T02:27:32+5:302017-01-18T12:37:33+5:30
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात निघालेल्या मूक मोर्चांमुळे येत्या निवडणुकांमध्ये समाजाची भूमिका निर्णायक ठरणार असताना आता या नावाने आणखी एका पक्षाची स्थापना

मराठा नावाने आणखी एका पक्षाची स्थापना
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात निघालेल्या मूक मोर्चांमुळे येत्या निवडणुकांमध्ये समाजाची भूमिका निर्णायक ठरणार असताना आता या नावाने आणखी एका पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रस्थापित पक्ष अपयशी ठरल्याने त्याच्या विकासाबरोबर मूलभूत राष्ट्रीय मराठा पक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी शनिवारी दिली. येत्या मुंबई महापालिकेत १०० जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रीय मराठा पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पक्षाच्या अध्यक्षपदी अंकुश पाटील आणि उपाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी आहेत. (प्रतिनिधी)