शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“मी शरद पवारांचा मानस पुत्र, माझं कुणीही...”; राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:29 IST

गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली

ठळक मुद्देशरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत सत्ताधारी पक्षातले नेते असे करत असतील आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का?, सुप्रिया सुळेंना पीडित महिलेचा प्रश्न राजेश विटेकर कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - तृप्ती देसाई

पुणे – मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत, या पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप लावले आहेत. दबावापोटी पोलीस राष्ट्रवादीच्या या नेत्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही असं तृप्ती देसाई(Trupti Desai) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.(Women Rape Allegation on NCP Rajesh Vitekar)  

या पत्रकार परिषदेत पीडित महिलेने दावा केला की, शरद पवार(Sharad Pawar) यांच्या निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर(NCP Rajesh Vitekar) यांनी माझ्यासोबत अत्याचार केले, त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखातं आमचं आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचं अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले. गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. शरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असं विटेकरांनी धमकावण्यात आलं असल्याचं आरोप या महिलेने केला.

मी एक शिक्षिका असून माझ्यावर असे अत्याचार होत असतील, तर इतर अशिक्षित महिलांवर किती अन्याय होत असतील. सुप्रिया सुळे, अजित पवार मला घरातले सदस्य मानतात, कोणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही, सत्ताधारी पक्षातले नेते असे करत असतील आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? माझ्याविरोधात बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहे, तपास सुरु आहे असं सांगत टाळाटाळ केली जाते, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटसह अनेक पुरावे आहेत. मुलींची अब्रु लुटायची आणि त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायचा हा कुठला प्रकार? सुप्रिया सुळेंकडे मी अनेकदा तक्रार केली परंतु माझी दखल घेतली नाही, मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का? राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना विटेकर यांच्याकडून धोका असल्याचं पीडित महिलेने दावा केला आहे.

दरम्यान, आमचा पक्ष सत्तेत आहे, आमचा गृहमंत्री आहे असं सांगून महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार घडतायेत, राष्ट्रवादी नेत्यांविरोधात असे आरोप होतायेत, ज्या पीडिता समोर येऊन सांगतात, त्यांना बदनाम करण्याचं काम नेत्यांकडून केले जातंय, पुराव्यानुसार गुन्हा दाखल होत नसेल तर पीडितांनी करायचं का? परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राजेश विटेकर, जे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत, त्यांच्याकडून पीडित महिलेवर दबाव टाकला जातो, गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पीडित महिलेवर दबाव टाकला जातो, पुरावे देऊनही ते नेते आहे, पैसेवाले आहेत म्हणून गुन्हा दाखल होणार नाही, तुम्ही तडजोड करा असं पोलिसवाले सांगतात, हे अजिबात योग्य नाही, अनेकांकडे या पीडित महिलेने मदत मागितली परंतु त्यांना मदत मागितली नाही. त्यानंतर आता ही महिला भूमाता ब्रिगेडकडे आली आहे, राजेश विटेकर कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे