शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मंकी हिल ते कर्जतदरम्यान आणखी महिनाभर मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:16 IST

दिवाळीच्या सुट्टीहून माघारी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर तांत्रिक कामे केली जाणार आहेत. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत कर्जत दिशेकडील रेल्वे मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

मुंबई-पुणे घाटात एक्स्प्रेससाठी तीन मार्गिका उपलब्ध आहेत. लोणावळा घाटात मंकी हिल घाटात तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत होणे अपेक्षित आहे. २१ आॅक्टोबर रोजी याच मार्गावर १० दिवसांचा ब्लॉक घेतला होता. मात्र या कालावधीत रेल्वेची कामे पूर्ण न झाल्याने पुन्हा लोणावळा घाटात मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक महिन्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.महिनाभर घेण्यात येणाºया या महाब्लॉकमुळे दिवाळीच्या सुट्टीत गावी किंवा बाहेरगावी गेलेल्या आणि आता सुट्टी संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी निघालेल्यांचे हाल होणार असल्याची नाराजी प्रवाशांमध्ये आहे.२२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

घेण्यात येणाºया मेगाब्लॉकमुळे २२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टनम-एलटीटी, एलटीटी-हुबली-एलटीटी, पनवेल-नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस ३१ नोव्हेंबरपर्यंत पुण्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत. यामुळे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.भुसावळ-पुणे- भुसावळ एक्सप्रेस दौंड-मनमाडमार्गे धावणारमंकी हिल ते कर्जत दरम्यान कर्जत दिशेकडील मार्गावर तांत्रिक कामासाठी २२ ऑक्टोबरपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेतला होता.मात्र या कालावधीत या मार्गावरील तांत्रिक बाबीची पूर्तता होणार नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबरचा संपूर्ण महिना ब्लॉक घेण्यात येईल. दह दिवस घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे २२ ऑक्टोबरपासून या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल होत आहेत.त्यातच आता ३० नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना नाराजी व्यक्त केली आहे. ब्लॉकदरम्यान, भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ३१ आॅक्टोबरपर्यंत दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे