शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 14:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबत गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. काल ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर असल्याचं सांगणारे आमदार अनिल पाटील यांनी यू-टर्न घेतला आहे.मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मा.अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो तिथे काय होणार आहे या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही ! कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या फेसबुक पोस्टचा फोटो राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी ट्विट केला असून, ते लवकरच स्वगृह परततील, असा आशावाद व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सदस्यांची यादी तयार केली होती. या यादीवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ही यादी बैठकीच्या वेळी तयार केली होती. मंडळाचे नेते म्हणून ही यादी त्यांच्याकडे होती. अंतर्गत कारणासाठी सह्या घेण्यात आल्या होत्या. त्या 54 जणांच्या पाठिंब्याची यादी म्हणून त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय? आणि राज्यपालांची फसवणूक केली का असा प्रश्न आपल्यासमोर आहे, असेही शरद पवार म्हणाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रपतीपुढे नेले जाणार आहे. आमच्याकडे बहुमत आहे हे लक्षात येताच राज्यातील फडणवीस सरकार राष्ट्रपतींना बरखास्त करावे लागेल. त्या दृष्टीनेही आमची चाचपणी सुरू आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019