शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:39 IST

Politics chandrkantpatil bjp kolhapur- पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.

ठळक मुद्देराज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटीलकोल्हापूरात राज्य सरकारवर टीकेची झोड

कोल्हापूर : पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

पाटील यांनी सांगितले, या महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनिल राठोड या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, दुसरे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, तर तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील असे भाकित पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले.

राज्यात कृत्रिम बहुमताचे सरकार सत्तेत आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी मतदान घेतले तर सरकारच्यामागे किती बहुमत आहे दिसून येईल. सचिन वाझे प्रकरणाची मुळे खूप लांबपर्यंत गेली असून एनआयए व एटीएस हे सर्व खोदून काढेल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, दीड वर्षांत एका मंत्र्याचा राजीनामा झाला. एक जाता जाता वाचला व आज, संध्याकाळपर्यंत एका मंत्र्याचा राजीनामा होईल. सरकार कसे चालले आहे हे त्यावरून दिसत आहे.पत्रकारांनी या मंत्र्याचे नाव काय असेल, असे विचारले असता वेट ॲन्ड वॉच असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवरुन राज्य् सरकारवर टीका केली. हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे.

सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे