आणखी एका लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
By Admin | Updated: June 23, 2017 18:51 IST2017-06-23T18:51:16+5:302017-06-23T18:51:16+5:30
औंध लष्करी वसाहतीत राहणा-या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आ

आणखी एका लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 23 - सांगवी येथे चार दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणा-या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्वाती अमोल जगदाळे (वय.२७ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती यांनी 19 जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सांगवी येथेही लष्करी जवानाची पत्नी ज्योती माहागावकर यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. एकाच आठवड्यात शहरात घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
सांगवी येथे लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (20 जून) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती प्रकाश महागावकर (वय 22) असे विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे पती लष्कराच्या औंध हेडक्वार्टर येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी कामावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले असता, घराचा दरवाजा ठोठावला.
परंतु दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता घरात पत्नी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महागावकर दाम्पत्य मूळचे कोल्हापुरचे असून ते सांगवी येथे ते खोली भाड्याने घेऊन राहत होते.