गर्भहत्या प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात
By Admin | Updated: March 19, 2017 01:10 IST2017-03-19T01:10:28+5:302017-03-19T01:10:28+5:30
म्हैसाळ येथील लिंगनिदान व गर्भपातप्रकरणी मिरज पूर्व भागातील एका बोगस डॉक्टरला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे याच्याकडे

गर्भहत्या प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात
मिरज (जि.सांगली) : म्हैसाळ येथील लिंगनिदान व गर्भपातप्रकरणी मिरज पूर्व भागातील एका बोगस डॉक्टरला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे याच्याकडे गर्भपाताचे रूग्ण पाठवत असल्याची कबुली संबंधित डॉक्टरने दिली आहे. याप्रकरणी एजंट विरनगोंडा गुमटे, संदीप जाधव, औषध विक्रेता भरत गटागट यांची पोलिस कोठडी सोमवारपर्यंत वाढविण्यात आली, तर डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगीकर, औषध विक्रेता सुनील खेडेकर, परिचारिका कांचन रोजे, उमेश साळुंखे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. डॉ. खिद्रापुरे याच्याकडे गर्भपात करणाऱ्या सात दाम्पत्यांची चौकशी सुरू असून, त्यांच्या डीएनए तपासणीचे नमुने मृत भ्रूणाच्या डीएनएसोबत जुळल्यास, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. (वार्ताहर)