शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इक्बाल कासकरविरूद्ध खंडणीचा आणखी एक गुन्हा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 21:45 IST

खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

ठाणे  - खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह चौघांना खंडणी विरोधी पथकाने गत महिन्यात अटक केली. त्यापैकी एक आरोपी पोलीस कोठडीत, तर कासकरसह उर्वरित तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. कासकरविरुद्ध मंगळवारी खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिसरे प्रकरण गोराई येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबईतील एका बिल्डरची गोराई येथे 38 एकर जमीन होती. या जमिनीच्या विक्रीचा सौदा त्याने एका व्यावसायिकाशी केला होता. त्यासाठी व्यावसायिकाकडून 2 कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली. जमीन विक्रीचा पूर्ण व्यवहार होण्यास जवळपास 2 वर्षे लागली. दरम्यानच्या काळात जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे हपापलेल्या बिल्डरने जमिन हवी असेल तर दुप्पट किमत मोजावी लागेल असे व्यावसायिकास सांगितले. जमिनीचे भाव वाढले असले तरी सौदा आधीच निश्चित केला असल्याने व्यावसायिकाने वाद घातला. जमिनीच्या या व्यवहारातून व्यावसायिकाला बाजूला करण्यासाठी बिल्डरने एका एजंटशी संपर्क साधला. या एजंटच्या माध्यमातून इक्बाल कासकरचा या वादात प्रवेश झाला. व्यावसायिकास या व्यवहारातून बाजूला करण्यासाठी त्याच्याकडून घेतलेले 2 कोटी आणि स्वत:जवळचे 1 कोटी अशी एकूण 3 कोटी रुपयांची खंडणी कासकरने बिल्डरकडून उकळली. हे प्रकरण 2015-16 चे असून, जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणोनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरुद् मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा