शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Aaditya Thackeray : ’महाराष्ट्रात येणारा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला,’ आदित्य ठाकरेंचा दावा; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:54 IST

Aaditya Thackeray on Semiconductor Project : वेदांता फॉक्सकॉननं सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत तो प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, असा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा अनेकदा भाजपवर आरोप करण्यात आला होता. परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका ट्वीटनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉननं आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचा दाखला देत त्यांनी हा दाव केलाय.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. “भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात सुरू होत असल्याचा आनंद आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं धक्का बसला आहे. यापूर्वी फोटो ट्वीट करत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा हेतू/वचनबद्धता हा प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर नेण्याची होती हे दिसते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई, एमआयडीसी यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सर्व अंतिम टप्प्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाला शुभेच्छाही दिल्या. तसंच विकासाचा नवा मार्ग निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारं राज्य करण्याचे प्रयत्न केल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये गुजरात सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचेही आभार मानले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात