परभणीतून आणखी एक अटक, इसिसशी संबंधित असल्याचा संशय
By Admin | Updated: August 7, 2016 13:27 IST2016-08-07T13:25:09+5:302016-08-07T13:27:40+5:30
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने परभणीतून आणखी एकाला अटक केली आहे. शेख इकबाल कबीर अहमद असे या युवकाचे नाव आहे.

परभणीतून आणखी एक अटक, इसिसशी संबंधित असल्याचा संशय
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. ७ - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने परभणीतून आणखी एकाला अटक केली आहे. शेख इकबाल कबीर अहमद असे या युवकाचे नाव असून तो २४ वर्षांचा आहे. इसिसशी संबंधित असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली.
यापूर्वी नासिर बेन आणि शाहिद खान यांना एटीएसने अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून शेख अहमदचे नाव समोर आले. परभणीच्या मदिना नगरभागातून शेख इकबाल कबीर अहमदला अटक करण्यात आली.
नासिर बेन, शाहिद खान आणि शेख अहमद तिघे परस्परांचे चांगले मित्र असल्याची माहिती मिळत आहे. तिघांचीही घरे एक कि.मी.च्या परिघात होती. मराठवाडयातून मागच्या काही दिवसात इसिसशी संबंधित असणा-यांना अटक झाली आहे. या अटकसत्रामुळे सिमी प्रमाणे इसिसचे स्लीपर मॉडयुल तयार झाल्याचे स्पष्ट होते.