शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना

By balkrishna.parab | Updated: October 20, 2017 07:12 IST

महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर...

वेंगुर्ला - गणपती म्हणजे मराठी माणसाचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. कोकणामधील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावीही असेच एक अनोखे गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात चक्क दिवाळीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते. तर काही मंदिरांमध्ये गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. मात्र उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र या सर्वाला अपवाद आहे. उभादांडा हे गाव वेंगुर्ला शहराला लागून आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या शेजारीच उभादांडा येथे हे मंदिर आहे. येथील गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते. कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक आरास करून ज्याप्रमाणे गणेशपूजा केली जाते त्याचप्रमाणे येथील मंदिरामध्ये  गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. येथील गणेशमूर्ती ही मातीची असते. गावातील गणपतीच्या चित्रशाळेमधून लक्ष्मीपूजनादिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते. त्यानंतर मंदिरातील पूजादि विधी सुरु होतात.या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी पूजना दिवशी प्रतिष्ठापित होणारी गणेशमूर्ती 5 किंवा 11 दिवसांनी विसर्जित होत नाही. तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन हे होळीच्या दिवशी होते. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टॅंडपासून काही मिनिटांच्याच अंतरावर आहे. त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. तसेच रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणपतीही येथून काही किलोमीटर अंतरावर आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkonkanकोकणKonkan Railwayकोकण रेल्वे