मलकापूरच्या विकास आराखड्याचा नकाशा जाहीर
By Admin | Updated: June 22, 2015 23:00 IST2015-06-22T23:00:32+5:302015-06-22T23:00:32+5:30
२२ आरक्षणे कायम : हरकतींसाठी महिन्याची मुदत

मलकापूरच्या विकास आराखड्याचा नकाशा जाहीर
कऱ्हाड : उन्हाळी पदार्थ घरोघरी बनविले जातात; पण याच उन्हाळी पदार्थांना व्यावसायिक जोड देण्याचे काम कऱ्हाडातील गीतांजली तारळेकर या गृहिणीने केले आहे. गीतांजली यांनी त्यांच्या राहत्या घरीच शेवयांसह अन्य उन्हाळी पदार्थ बनविण्याचा व्यवसाय सुरू केला असून, या पदार्थांना पुणे, मुंबईसह अन्य ‘मेट्रो सिटी’ची बाजारपेठ मिळाली आहे. शहरातील मंगळवार पेठेत वास्तव्यास असणाऱ्या गीतांजली तारळेकर या गृहिणीने उन्हाळी पदार्थ बनविण्याचा व त्याची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.प्रारंभी तारळेकर कुटुंबीय आसपासच किरकोळ किमतीत या पदार्थांची विक्री करीत होते. मात्र, कालांतराने या व्यवसायाला चालना मिळत गेली. तारळेकर यांनी बनविलेल्या शेवया, पापड, भातवडी, उडीद पापड आदींची शहरातील दुकानांमधून मागणी होऊ लागली. सध्या तर हे पदार्थ पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी या भागांतही विक्रीसाठी पाठविले जात आहेत. त्याला मागणीही जास्त आहे. वास्तविक, मार्च ते मे महिन्याअखेरीस प्रत्येक घरात उन्हाळी पदार्थ बनविले जातात. मात्र, तारळेकर यांच्या घरी वर्षातील नऊ महिने हे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. गीतांजली यांना त्यांची मुलगी सोनाली ही या कामात मदत करते. मशीनच्या साह्याने प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलो शेवया येथे तयार केल्या जातात. तसेच त्याचठिकाणी त्या वाळविल्या जातात. आपल्या या व्यवसायाबद्दल माहिती देताना गीतांजली तारळेकर म्हणाल्या, ‘सुरुवातीला शेवया आणि पापड बनविण्याचा हा व्यवसाय कितपत साथ देईल, याबाबत मी साशंक होते. मात्र, कुटुंबीयांच्या साथीमुळे या उन्हाळी पदार्थांना चांगली बाजारपेठ मिळाली. पावसाळ्यातील फक्त तीन महिने मी हा व्यवसाय बंद करते. एरव्ही नऊ महिने येथे आम्ही विविध पदार्थ बनविण्यात दिवस घालवतो. पदार्थ बनविण्यास सकाळी सुरुवात केली की रात्री दहा वाजेपर्यंत आमचे काम सुरूच असते.’ (प्रतिनिधी)
शेवायांनाही विविध ‘फ्लेव्हर’...
शेवयाला व्यावसायिक जोड मिळाल्यामुळे गीतांजली यांनी त्यामध्ये वेगवेगळे बदल केले आहेत. येथे शेवया बनविताना त्या प्रामुख्याने मँगो, पांढऱ्या व मॅगी या तीन प्रकारांत बनविल्या जातात. त्यामध्येही लहान, मध्यम व मोठी असे तीन प्रकार आहेत.
‘रमजान’मुळे शेवयांना मागणी वाढली
मुस्लीम बांधवांचा ‘रमजान’ महिना सध्या सुरू झाला आहे. या महिन्यात तीस दिवस मुस्लीमबांधव उपवास करतात. उपवासाची सांगता म्हणजेच ‘रमजान ईद.’ यादिवशी प्रत्येक मुस्लीम कुटुंबात शिरखुर्मा बनविला जातो. हा शिरखुर्मा बनविण्यासाठी अनेक मसाले वापरले जातात. या मसाल्यांबरोबरच शेवयांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तारळेकर यांनी बनविलेल्या शेवयांना त्यामुळे सध्या चांगली मागणी आहे.