बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Updated: June 7, 2017 04:24 IST2017-06-07T04:24:09+5:302017-06-07T04:24:09+5:30

जुलै २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले

Announcing the 12th round of the test | बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुलै २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार लेखी परीक्षा दि. ११ ते २८ जुलै या कालावधीत होणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा दि. ११ ते २५ जुलै या कालावधीत होईल. तर प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा दि. १ ते १० जुलै यादरम्यान घेतली जाणार आहे. विभागीय मंडळांनी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांना वितरित केलेले परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत असेल. खासगी व्यक्ती, क्लासेस किंवा अन्य यंत्रणांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी अवलंबून राहू नये, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

Web Title: Announcing the 12th round of the test