शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:03 IST

या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात आंदोलन करत होते. त्यानंतर विधानसभा, विधान परिषदेच्या कामकाजाला सकाळी ११ च्या सुमारास सुरुवात झाली. दोन्ही सभागृहात राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात झाली. 

विधानसभेसह विधान परिषदेतही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेतील सभागृह नेतेपद रिक्त होते. या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. त्यानंतर सभागृहाच्या संमतीनंतर उपसभापतींनी देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. 

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिली. यात रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे, भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, अमशा पाडवी, श्रीकांत भारतीय यांचा समावेश होता. 

विधिमंडळ नेत्यानंतर सभागृह नेता महत्त्वाचं पद असते. विधानसभेत मुख्यमंत्री सभागृहाचे नेते असतात तर विधान परिषदेत सरकारची आक्रमक बाजू मांडण्यासाठी अभ्यासू चेहऱ्याला संधी दिली जाते. मागील सरकारच्या काळात सभागृह नेतेपदी सुरुवातीच्या काळात सुभाष देसाई आणि त्यानंतर अजित पवारांना जबाबदारी दिली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यामुळे विधान परिषदेतील सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. 

विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गट आमनेसामनेविधान परिषदेत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. अंबादास दानवे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ १२ इतके आहे. दानवे यांच्या निवडीमुळे विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनेही दावा केला होता. महाविकास आघाडीत आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसनं शिवसेनेवर लावला होता. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Parishadविधान परिषदEknath Shindeएकनाथ शिंदे