मोडी लिपी स्पर्धेचे निकाल जाहीर

By Admin | Updated: June 11, 2016 02:19 IST2016-06-11T02:19:22+5:302016-06-11T02:19:22+5:30

द्वितीय राज्यस्तरीय सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सहयोगाने आयोजित करण्यात आल्या.

The announcement of the modi script competition resulted | मोडी लिपी स्पर्धेचे निकाल जाहीर

मोडी लिपी स्पर्धेचे निकाल जाहीर


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय राज्यस्तरीय सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सहयोगाने आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत ३०० जण सहभागी झाले होते. त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेतील सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुंबई केंद्रात भाऊराव विष्णू घाडीगावकर यांनी पहिले स्थान पटकाविले. तर प्रणव पटवर्धनने द्वितीय आणि सागर तोडणकर याने तृतीय स्थान मिळविले. पुणे केंद्रातून प्रथम स्थान अमेय वैद्य, द्वितीय स्थान दत्तात्रय देशपांडे आणि तृतीय स्थान श्रुती गावडे यांनी पटकाविले.
नाशिक केंद्रातून प्रथम पारितोषिक सायली सप्रे, द्वितीय पारितोषिक सतीश देशपांडे, तृतीय पारितोषिक मृणालिनी उगळे यांनी मिळविले. तर शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेत मुंबई केंद्रातून प्रथम सूर्यकांत पेडणेकर, द्वितीय श्रद्धा शेट्ये आणि तृतीय वर्षा अंचवले यांनी बाजी मारली. तर पुणे केंद्रातून अमेय वैद्यने प्रथम, दत्तात्रय देशपांडेने द्वितीय आणि मेघना ओक यांनी तृतीय स्थान मिळविले. त्याचप्रमाणे नाशिक केंद्रातून सतीश देशपांडे याने प्रथम, सायली सप्रेने द्वितीय आणि तुंग फडकेने तृतीय स्थान मिळविले. (प्रतिनिधी)

Web Title: The announcement of the modi script competition resulted