शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

"कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?"; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:40 IST

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात निधी नेमका कुठून आणि कसा द्यायचा असा मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर आहे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी  ही योजना लागू असणार आहे. पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र आता ही योजना वादात सापडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या या योजनेसाठी निधी आणायचा कुठून असं म्हणत अर्थ खात्याने याला तीव्र विरोध केल्याचे समोर येत आहे. अर्थखात्याने ही योजना सुरु करण्यास विरोध दर्शविला होता अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी ही योजना राबवण्यावर ठाम आहेत. कर्ज आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असे नसतं असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

राज्यातील तब्बल २ कोटी महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरु शकणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी वार्षिक ४६ हजार कोटींची आवश्यकता असून २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता हा निधी नेमका द्यायचा कसा अशी चिंता अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याला लागली आहे.

योजनेबाबत कोणते आक्षेप?

योजनेसाठी दर वर्षी ४६ हजार कोटी रुपये कुठून आणणार ? या संदर्भातील तरतूद कशी करायची? असा प्रश्न अर्थ खात्यापुढे आहे. तसेच राज्यावर ७.८ लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे? राज्यातील महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय,आदिवासी विकास,महिला-बालकल्याण अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे या योजनेमुळे एकाच लाभार्थ्याला दोन-दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा अर्थखात्यात सुरु आहे.

योजना राबवण्यावर सत्ताधारी ठाम

"आमच्या दोन कोटी बहिणी ऑनलाईन खर्च करत नाहीत. त्या आसपासच्या बाजारातून खरेदी करतील तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल. जे लोक सरकारी तिजोरीची चिंता करत गरीब महिलांवर अन्याय करायचा विचार करत आहेत त्यांच्याविषयी वाईट वाटतं. १६ लाख लोकांसाठी तुम्ही ४४ हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही," अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

"कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं होणार नाही. ही योजना राज्यातील गोरगरिब महिला वर्गाकरता आहे. अर्थखात्याने त्यांचे काम केले असेल. खर्चाबाबत बोलणं त्यांचे काम आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे या योजना राबवल्या जाणार आहेत," असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार